दैनंदिन जीवनातील मानसिक टेंशन, कामाचा अतिरिक्त ताण, विविध कर्ज, दररोज वाढणारी महागाई, मुलांचे शिक्षण अनियमित, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यसन, अनिद्रा , योगा व व्यायामाचा अभाव, परिवारीक वाद, जनरेशन गॅप, ऑफिस मधील टार्गेटेड काम, यांसारख्या असंख्य अडचणीमुळे उच्च रक्तदाब, रुदयरोग मधुमेह व लिव्हर पोटासंबधी आजार उद्भवतात यामुळे व्यक्ती दवाखान्यात अॅडमिट झाल्यावर मेडिक्लेम किवा इन्शुरन्स नसल्यामुळे आयुष्याची कमाई खर्च होते. त्यामुळे या खर्चाला प्रतिबंध उपाय म्हणजे “ आरोग्य संजीवनी योजना ’’ ही तुमच्यासाठी प्रभावी योजना आहे.
सदर योजना कोणतीही मेडिक्लेम किवा इंसुरन्स नसून कर्मचार्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ति करताना येणाऱ्या अडचणीवर प्रभावी उपाय म्हणून काम करते.
- शासकीय किवा निमशासकीय (१००% अनुदानित) कार्यारत कर्मचारी या योजेस पात्र आहे.
-
आरोग्य संजीवनी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम : १९६१ व त्यानुसार निर्गमित केलेले नियम सुधारनेनुसार अवलंबून असणारे कुटुंबातील सभासद स्वत: कुटुंबातील असलेले पती/पत्नी, पहिली दोन मुले, दि. १ मे २०००१ तत्पूर्वीचे अवलंबून असलेले ३ रे आपत्ये, अवलंबून आई - वडील, सासू - सासरे हे पात्र राहतील.
-
कर्मचाऱ्या वरील अवलंबून असलेले आपत्ये चे वय २५ पेक्षा जास्त तसेच तो लग्न किवा नोकरीस नसेल तर तो/ती योजनेस पात्र आहे .
-
कर्मचाऱ्या वर अवलंबून असलेले आई वडील किंवा महिला कर्मचाऱ्याच्या बाबतीत आई किंवा सासू सासरे राज्य/केंद्र सरकारी व निमसरकारी सेवेतून सेवानिवृत्ती झालेले असल्यास व त्यांना निवृत्ती वेतन मिळत असेल/नसेल तरी अन्य मार्गानी उत्पन्न हे दरमहा ९०००/- इतके मूळ निवृत्ती वेतन घेणार्या सेवानिवृत्ती राज्य शासकीय कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या उप्लब्धीच्या मर्यादेत ९०००/- कमी असेल तर ती / तो या योजनेस पात्र आहे .
-
महाराष्ट्रातील नामवंत नेटवर्क हॉस्पिटल मध्ये २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारासाठी अॅडमिट झाल्यावर २४ ते ४८ तासात कॅशलेस उपलबद्ध.
-
२७ आकस्मिक व ५ गंभीर आजारासाठी ३ लाखापर्यंत कॅशलेस चा फायदा. ( ना देयकाचा यात समावेश नाही. )
-
३ लाखापर्यंत कॅशलेस संपल्यावर गरज भासल्यास अडिशनल २ लाख कॅशलेसची सुविधा संपूर्ण कुटुंबासाठी राखीव असेल.
-
डिस्चार्जच्या वेळी ना देयक सोडून कोणतेही बिल न भरता डिस्चार्ज मिळेल.
-
डिस्चार्ज नंतर वैद्यकीय प्रतिपूर्ति फाइल बनविणे, फाईल कार्यालयात जमा करणे, जिल्हा शल्यचिकित्सक कडून पारित करणे, कार्यालतील जमा असलेले बिलाचा फॉलो उप घेण ईत्यादी कामे कंपनी करते .
महत्वाची सूचना :
- डिस्चार्ज करतेवेळी वैद्यकीय प्रतिपूर्तीचे सर्व कागदपत्रवर सही करून देणे बंधनकारक आहे. तसेच सॅलरी अकाऊंटचा (अकाऊंट पे) चेक व प्रॉमिसरी नोट देणे बंधनकारक राहील.
- बिल पारित झाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या अकाऊंटला जमा झालेली रक्कम कंपनीला डिस्चार्जच्या वेळी दिलेल्या अकाऊंटच्या चेक चे देणे बंधनकारक राहील .
- हेल्थ कार्ड रु. २५००/- सेवा शुक्ल (संपूर्ण कुटुंबासाठी),
- आवशक कागदपत्रे : १) आधार कार्ड झेरोक्स २) कर्मचारी ओळखपत्र झेरोक्स ३) १ फोटो फक्त कर्मचाऱ्याचा